अमेरिकन निवडणुकीत भारताचा बोलबाला; प्रचारात मोठी व्हॅल्यू

0

वॉशिंग्टन: अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीचे पडघम वाजले आहे. प्रचाराचा जोर देखील वाढला आहे. सत्ताधारी रिपब्लिकन पक्षाकडून स्वत: राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प निवडणूक लढविणार आहे तर विरोधी पक्ष असलेल्या डेमोक्रॅटिक पक्षाकडून जो बिडेन हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. दोन्ही पक्षाची टीम प्रचाराला लागले आहेत. अमेरिकन निवडणुकीतही भारताचा बोलबाला दिसून आला आहे. यावरून भारतीय मतांना मोठे व्हॅल्यू असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीमने प्रचार अभियानाचा पहिला व्हिडीओ प्रदर्शित केला आहे. या व्हिडीओमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण करताना दिसतात तसेच ‘नमस्त ट्रम्प’ या कार्यक्रमात डोनाल्ड ट्रम्प यांनी अहमदाबादमध्ये केलेल्या भाषणाची दृश्ये सुद्धा या व्हिडीओमध्ये आहेत. तर दुसरीकडे डेमोक्रॅटिक पक्षाचे राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार जो बिडेन यांनी भारतीयांना दिल्या गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दोन्ही पक्षांच्या विजयात भारतीय मते निर्णायक ठरणार आहेत. अमेरिकेतील भारतीय वंशाच्या मतदारांना आकर्षित करणे हा उद्देश आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीमने प्रसिद्ध केलेल्या व्हिडीओमध्ये ‘हाऊडी मोदी’, ‘नमस्ते ट्रम्प’ या कार्यक्रमातील क्लिप्स वापरण्यात आल्या आहेत. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात ‘नमस्ते ट्रम्प’ कार्यक्रमासाठी डोनाल्ड ट्रम्प सहकुटुंब अहमदाबादमध्ये आले होते. त्यावेळी दोन्ही नेत्यांनी भाषण केले होते. ‘पुन्हा चारवर्ष’ असे या १०७ सेकंदाच्या व्हिडीओचे शीर्षक आहे.

राष्ट्राध्यक्षांचा मुलगा डोनाल्ड ट्रम्प ज्युनियरकडे प्रचार अभियानाची जबाबदारी आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून पहिल्या काही तासातच टि्वटरवर ६६ हजार जणांनी हा व्हिडीओ पाहिला आहे.

“अमेरिका, भारत आणि जगभरात हिंदू उत्सव गणेश चतुर्थी साजरी करणाऱ्या प्रत्येकाल सर्व अडथळयांवर मात करता येऊ दे, नव्या सुरुवातीकडे जाणारा मार्ग मिळूं दे, अशा शब्दात बिडेन यांनी गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तत्कालिन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या कार्यकाळात बिडेन यांनी उपराष्ट्राध्यक्षपदही भूषवले आहे.