अमेरिका भारताला देणार 22 गार्जियन ड्रोन

0

अमेरिकाने भारताला 22 गार्जियन ड्रोन विकण्याची तयारी दर्शवली आहे. ‘नाटोे’मधील सदस्य देशांच्या व्यतिरीक्त दुसर्‍या देशांशी याबाबतचा केलेला अमेरिकाचा हा पहिला करार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी वॉशिंग्टनच्या दौर्‍यावर जाण्याआधीच हा करार झाला. ही घटना द्विपक्षीय संबंधांसाठी महत्त्वपूर्ण समजली जात आहे. या दौर्‍याच्या दरम्यान पंतप्रधान मोदी अमेरिकाचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेेणार आहेत. उपरोक्त कराराबाबत परराष्ट्र मंत्रालयाने भारत सरकार आणि उत्पादन करणार्‍या कंपन्यांना यासंबंधी अवगत केले आहे. हा करार सुमारे तीन अरब डॉलर इतका असणार आहे. यावरून ओबामा प्रशासनाच्या तुलनेत ट्रम्प प्रशासन भारताशी संबंध प्रस्थापित करण्यात अधिक प्रयत्नशील आहे, हे स्पष्ट होते. ओबामा प्रशासनाने भारताला अमेरिकाचा ‘मेजर डिफेन्स पार्टनर’ हा दर्जा दिला होता. त्याला अमेरिकातील संसदेत मंजुरी देण्यात आली. त्याचा अधिक प्रभाव यामुळे पडणार आहे.