अमेरिकेकडून पाकिस्तानला धक्का; संरक्षण मदत रोखली

0

वॉशिंग्टन : अमेरिकन सरकारने पाकिस्तानला जोरदार झटका दिला आहे. अमेरिकेचे राष्ट्रपति डोनाल्ड ट्रंप यांनी अमेरिकेकडून पाकिस्तानला देण्यात येणारी १.६६ अरब डॉलरची सुरक्षा मदत रोखण्याचे निर्देश दिले आहे. संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते कर्नल रॉब मैनिंग यांनी हे घोषणा केली आहे. आगामी वर्षात जानेवारी पासून ही मदत रोखली जाणार आहे. पाकिस्तान शेजारी राष्ट्राला त्रास देत असतो, पाकिस्तानच्या हरकतीत सुधारणा होत नसल्याने अमेरिकेने ही पाऊले उचलली आहे.