अमेरिकेची धमकी म्हणजे कुत्र्याचे भुंकणे

0

सोल : संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत डोनाल्ड ट्रम्प यांनी उत्तर कोरियाला धमकी दिली की उत्तर कोरियाने अमेरिका किंवा त्याच्या कोणत्याही सहकारी देशावर हल्ला केला, तर अमेरिका उत्तर कोरियाचा विनाश करेल. मात्र, अमेरिकेच्या या धमकीला उत्तर कोरियाने धुडकावून लावले आहे. अमेरिकेची धमकी म्हणजे कुत्र्याचे भुंकणे, अशी हेटाळणी करण्यात आली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या महासभेसाठी न्यूयॉर्कमध्ये आलेले उत्तर कोरियाचे संरक्षण मंत्री री योंग हो यांना ट्रम्प यांच्या भाषणावरील प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी त्या भाषणाची तुलना अप्रत्यक्षपणे कुत्र्याच्या भुंकण्याशी केली. आक्रमक अमेरिकेपासून संरक्षण करण्यासाठी आम्हाला आण्विक शस्त्रास्त्रांची गरज आहे, असे उत्तर कोरियाचे म्हणणे आहे.