म्युनिच । अमेरिकेचे उपराष्ट्रपती माईक पेस यांनी नाटोला सर्व ती मदत करण्याचे आश्वासन दिल्यामुळे, डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यावर नाटोच्या भविष्याबाबत विचारल्या जाणार्या प्रश्नाला शनिवारी पूर्णविराम मिळाला.
अमेरिकेचे नाटोला नेहमीच पूर्ण सहकार्य मिळत राहील. पण इतर सदस्य देशांनीही सुरक्षिततेच्या बाबतीत नाटोमधील योगदान वाढवले पाहिजे, असे पेस यांनी जर्मनीतील 53 व्या म्युनिच सुरक्षा संमेलनात बोलताना सांगितले. अमेरिकेचा नाटोला पूर्ण पाठिंबा असून उत्तर अटलांटिक गटासाठी अमेरिका वचनबद्ध आहे असे प्रतिपादन पेस यांनी या वेळी केले.