नवी दिल्ली। चीन, तैवान आणि व्हिएतनाम यांनी मालकीचा दावा केलेल्या वादग्रस्त बेटाजवळ अमेरिकेची युद्ध नौका फिरत आहे. दक्षिण चीन महासागरातील या बेटावरील तीन देशांच्या हक्कदारीला अमेरिकेने आव्हान दिल्याचे मानले जात आहे. अमेरिकी संरक्षण खात्याच्या अधिकार्याने ही माहिती दिली.
अमेरिकेची फॉनॉप मोहीम
पॅरासेल बेटापासून 12 सागरी मैलांवर अमेरिकेची युद्ध नौका लक्षवेधी क्षेपणास्त्र विध्वंसक युएसए स्टेथेम ही यंत्रणा सज्ज ठेऊन दक्षिण चीन सागरात फिरत आहे. नौकानयनाचे स्वातंत्र्य किंवा फॉनॉप मोहीम अमेरिका या महासागरात राबवत आहे. डोनाल्ड ट्रम्प अध्यक्ष झाल्यापासून ही अशी दुसरी मोहीम आहे. चीनने कृत्रिम बेट बांधल्यानंतर अमेरिका अशा प्रकारे चीनवर दबाव टाकत आहे.
चीनचीही युद्धनौका तैनात
चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने अमेरिकेने चीनच्या सागरी हद्दीत अनधिकृत प्रवेश केल्याचा आरोप केला आहे. गंभीर राजकीय आणि लष्करी चिथावणी आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता लु कांग म्हणाले.
अमेरिका संकेत धुडकावतेय
कोणत्याही देशाच्या किनार्यापासून 12 सागरी मैल ही त्या देशाची समुद्रातील हद्द असते. तसे आंतरराष्ट्रीय संकेत आहेत. परंतु अमेरिका हे संकेत धुडकावून लावत आहे, असा आरोप करण्यात आला आहे.