अमेरिकेच्या युद्धनौका दक्षिण चीन समुद्रात दाखल झाल्यामुळे तणाव

0

वॉशिंग्टन/बीजिंग । दक्षिण चीन समुद्रावरील दाव्यावरून सुरू असलेल्या वादामुळे आता युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अमेरिकेने या वादग्रस्त समुद्राकडे चक्क युद्धनौका पाठवल्याने परिस्थिती तणावाची बनली असून, अमेरिकेच्या या कृत्याचा चीनने निषेध केला आहे. अमेरिका सार्वभौमत्वाचा भंग करत आहे, अशा शब्दांत चीनने विरोध दर्शिवला आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ’फ्रीडम ऑफ नेव्हिगेशन’ या योजनाचा हा एक भाग असल्याची चर्चा सुरू आहे. अमेरिकेची युद्धनौका बुधवारी स्प्रेटली बेटाच्या (मानवनिर्मित- चीनचं बेट) 20 किलोमीटर परिसरात पोहोचली असल्याची माहिती समोर आली आहे. पेंटागॉनचे प्रवक्ता जेफ डेव्हिस यांनीही याबाबतची माहिती दिली.दक्षिण चीन समुद्रासह आशिया-पॅसिफिक क्षेत्रात आमचा नियमीतपणे अभ्यास सुरू असतो. आम्ही आंतरराष्ट्रीय नियमांचं उल्लंघन केलेलं नाही. नियमांनुसार आम्ही येथे हवाई, नौदलाचे संचालित करू शकतो., असे पेंटागॉनचे प्रवक्ते जेफ डेवीस यांनी सांगितले.

काही दिवसांपूर्वीच चीननेही या समुद्रातील बेटांवर लष्करी तळ तैनात केले होते. दक्षिण चीन समुद्रावर चीनसह मलेशिया, इंडोनेशिया, फिलीपाईन्स आणि व्हिएतमान या देशांनी हक्क सांगितला आहे. मात्र, चीन दादागिरीने या समुद्रावर कब्जा करत आहे. अखेर हा मुद्दा लवादाकडे गल्यानंतर चीनने लवादाच्या निर्णायालाही विरोध केला.