अमेरिकेतील नाईट क्लबमध्ये गोळीबार

0

वॉशिंग्टन : अमेरिकेतील एका नाईट क्लबमध्ये रविवारी झालेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला तर 13 जण जखमी झाले. सिनसिनाटी येथील एवेन्यू कॅमयो नाईट क्लबमध्ये ही घटना घडली. हा अतिरेक हल्ला असण्याचा अंदाज वर्तविण्यात येत असला तरी पोलिसांनी अद्याप दुजोरा दिलेला नाही. हल्ल्यातील गंभीर जखमींना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले असून काहीजणांची प्रकृती चिंताजनक आहे.

रात्री एक वाजताच्या सुमारास कॅमियो नाईट क्लमध्ये गोळीबार झाल्याचे समजताच पोलिस घटनास्थळी पोहचले. संपुर्ण परिसर पोलिसांनी ताब्यात घेतला. एका पोलिस अधिकार्‍याने सांगितले की, सध्या तरी घटनास्थळी भयावह स्थिती आहे. गोळीबार झाला तेव्हा सुमारे शंभर लोक आतमध्ये होते. हल्लेखोरांनी अंदाधूंद गोळीबार करत अनेक राऊंडचा गोळीबार केला. हल्लेखोरांचा तपास सुरू करण्यात आला आहे. मागील वर्षभरातील गोळीबाराचा हा दुसरा प्रकार आहे. यापुर्वी फ्लोरिडमध्ये पल्स एलीबीटी नाईट क्लबमध्ये अतिरेक्यांनी केलेल्या गोळीबारात 53 लोक मरण पावले होते. तर 50 जण जखमी झाले होते. 30 जणांना अतिरेक्यांनी ताब्यात घेतले होते. या हल्ल्याची जबाबदारी ईसिस या अतिरेकी संघटनेने घेतली होती.