अमेरिकेत घरच्या घरी घेतलेली औषधे ठरताहेत जीवघेणी

0

न्यूयॉर्क – घरच्या घरी औषधे घेणे, त्या औषधांचा डोसही चुकीचा घेणे अशा वैद्यकीय उपचारांनी ४०० जणांचा बळी घेतला आहे. १३ वर्षे अभ्यास करून डॉक्टर आणि दवाखान्यांच्या परिघाबाहेरील उपचारामुळे होणाऱ्या वाढत्या मृत्युंबद्दल सावधगिरीचा इशारा अमेरिकेतील शास्त्रज्ञांनी दिला आहे.

विषबाधा नियंत्रण केंद्रांकडील माहितीचे विश्लेषण शास्त्रज्ञांनी केले. त्यांनी अशीच प्रकरणे निवडली की ज्यांना औषधे घेऊन गंभीर आजार जडले. तसेच घरच्या घरी स्वतःच डॉक्टर बनलेल्यांवरच त्यांनी लक्ष केंद्रित केले. २००० ते २०१२ पर्यंत विषबाधा नियंत्रण केंद्रांना जवळपास ६७ हजार कॉल आले. त्यापैकी बऱ्याचजणांची तक्रार होती की औषधे घेऊन आम्हाला आजारपण आले. या कालावधीत २००० मध्ये तीन हजार ६५ असे कॉल आले ते वाढतवाढत जाऊन ६ हजार ८५५ झाले. प्रति लाख एक ते प्रतिलाख दोन असे चुकीच्या औषधांना बळी पडलेल्यांचे प्रमाण या कालावधीत झाले. औषधोपचाराने त्रस्त झालेल्यांपैकी ३३ टक्के लोकांना हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले.

एक गोळी घ्यायला सांगितली तर दोन घ्यायच्या आणि चमचाभर औषध अर्धा कप घ्यायचे असेही प्रकार लोकांनी केले. औषध कंपन्यांनी यात महत्वाची भूमिका बजावली पाहिजे असे सेंट्रल ओहिओ पॉईझन सेंटरच्या हेनरी स्पिलर यांना वाटते. डोस कसे घ्यावे हे औषधांवर स्पष्ट लिहिलेले पाहिजे असे ते म्हणतात. तितकेसे शिक्षित नसलेले आणि अंक व प्रमाणाचे ज्ञान नसलेले लोकही औषधांवरील सूचना समजू शकले पाहिजेत.

चुकीची औषधे घेतल्याचा परीणाम…

आळस किंवा गुंगी

कमी रक्तदाब

हृदयाचे ठोके वेगात किंवा मंद

चक्कर येणे

कोणती औषधे घेतली…

हृदयविकारावरील औषधे

वेदनेवरील औषधे

इन्सुलिन आणि हार्मोनसंबंधीत औषधे

कॅल्शियम नाशक आणि क्लोनिडाईन

 

कसे टाळायचे औषधाचे दुष्परीणाम

पालकांनी, नर्सने लक्ष ठेवणे

परीणाम समजल्या शिवाय औषध न घेणे

डॉक्टरांना प्रश्न विचारून समजून घेणे