अमेरिकेत पोहोचले मोदी

0

वॉशिंग्टन । बहुप्रतीक्षेतील मोदी-ट्रम्प भेटीचा क्षण जवळ आला आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौर्‍यानिमित्त रविवारी वॉशिंग्टनमध्ये पोहोचले आहेत. मोदींच्या स्वागताला राजदूत नवतेज सरना पत्नीसह हजर होते. याआधी डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करून मोदींना आपला खरा मित्र असल्याचे सांगितले. त्यांनी अमेरिकी राष्ट्राध्यक्षांच्या ऑफिशियल अकाउंटवरून ट्विट केले की, भारतीय पीएम मोदी यांच्या स्वागतासाठी व्हाइट हाऊस तयार आहे. महत्त्वाच्या धोरणांवर आमच्या खर्‍या मित्राशी चर्चा होईल.

सोमवारी होणार पहिली भेट
सोमवारी मोदी डोनाल्ड ट्रम्प यांना पहिल्यांदाच भेटतील. या दौर्‍यादरम्यान दोन्ही देशांत अनेक महत्त्वाचे करार होण्याची अपेक्षा आहे. विमानतळावरून मोदींचा ताफा विलार्ड हॉटेलमध्ये पोहोचला. तेथे त्यांच्या थांबण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. भारतीय वेळेनुसार, रविवारी संध्याकाळी ते अ‍ॅमेझॉनचे सीईओ जेफ बेजोस, अमेरिकन टॉवर कॉर्पोरेशनचे चेअरमन जिम टॅक्लेट, अ‍ॅपलचे सीईओ टीम कूक, अ‍ॅडोबचे सीईओ शंतनू नारायणन, कॅटरपिलरचे सीईओ जिम उम्पलबी, गूगलचे सीईओ सुंदर पिचाई याचप्रमाणे प्रमुख आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या सीईओंची भेट घेऊन चर्चा केली.

भेटीवर जगभरात उत्सुकता
रविवारी एकूण 19 कंपन्यांच्या सीईओंशी पंतप्रधान मोदींची दीड तास चर्चा झाली. आज ट्रम्प यांची ते व्हाइट हाऊसमध्ये भेट घेणार आहेत. दोन्ही नेत्यांच्या या पहिल्या भेटीवर जगभरात उत्सुकता आहे.