अमेरिकेत लवकरच कोरोनाची लस तयार होणार: डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा

0

वॉशिंग्टन: जगात सर्वाधिक कोरोना ग्रस्तांची संख्या अमेरिकेत आहे. दररोज हजारो अमेरिकन नागरिकांचा कोरोनामुळे जीव जात आहे. मात्र अमेरिकेसारख्या महासत्ता असलेल्या प्रगत राष्ट्रालाही कोरोना विरुद्ध लस बनविण्यात अद्याप यश आलेले नाही. परंतु अमेरिकेत कोरोना विरुद्धची लस तयार करण्याचे काम सुरू असून लवकरच लस तयार असेल असा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प या यांनी केला आहे. अमेरिकेत करोनामुळे ५० हजाराहून जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. तर आठ लाखांहून अनेकांना लागण झाली आहे. डोनाल्ड ट्रम्प व्हाइट हाऊसमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी उपराष्ट्राध्यक्ष माइक पेन्स आणि व्हाइट हाऊसचे करोना व्हायरस टास्क फोर्सचे समन्वयक डेबोरा बीरेक्सही उपस्थित होते.