अमेरिकेने पाकिस्तानवर उगारले डोळे

0

दहशतवादाला खतपाणी घालणार्‍या पाकिस्तानवर आता बिकट परिस्थिती ओढवली आहे. अमेरिकी प्रतिनिधी सभेने पाकिस्तानला सुरक्षा क्षेत्रात मदतीसाठी देण्यात येणार्‍या अमेरिकी निधीच्या अटी आणखी कडक करण्याचे ठरविले आहे. अमेरिकी प्रतिनिधीगृहाने एकमताने सरंक्षण आर्थिक निर्बंधातील तीन अटींत सुधारणांना मंजुरी दिली आहे. त्यानुसार, पाकिस्तानला दहशतवादविरोधी लढ्यामध्ये समाधानकारक प्रगती दाखवावी लागेल. अमेरिकी परराष्ट्रमंत्र्यांना हे सभागृहाला पटवून द्यावे लागणार आहे. यामुळे पाकिस्तानलाही आता दहशतवादाविरोधात दोन हात करावे लागणार आहेत अन्यथा अमेरिकेकडून देण्यात येणार्‍या आर्थिक मदतीपासून वंचित राहावे लागेल. त्याचबरोबर, अमेरिकेकडून करण्यात येणार्‍या कडक कारवाईलाही सामोरे जावे लागू शकते. या अटी पाकिस्तानकडून दहशतवाद्यांना देण्यात येणार्‍या मदतीसंबंधित आहेत. या संबंधित यापूर्वी अनेकदा अमेरिकी अधिकार्‍यांनी चिंता व्यक्त केली होती.