अमेरीकेवर हल्ला करण्याची अखेरची इच्छा

0

नवी दिल्ली। अलकायदा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख आयमन अल जवाहिरीची अमेरिकेवर हल्ला करण्याची इच्छा आहे. डोळे मिटण्याआधी अमेरिकेवर मोठा हल्ला करण्याची इच्छा अल जवाहिरीने बोलून दाखवली आहे. न्यूजवीकने सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे.

जवाहिरी आणि हमजा बिन लादेन या दोघांना आयएसआय या पाकिस्तानच्या गुप्तचर संघटनेने आसरा दिल्याची शक्यता असून, हे दोघे कराचीमध्ये असावेत असे न्यूजवीकने सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे. अमेरिकेने फगाणिस्तानात अलकायदा विरुद्ध मोहिम उघडल्यापासून पाकिस्तान अल जवाहिरीला संरक्षण देत आहे. अमेरिका जवाहिरीच्या मागावर असून, मागच्यावर्षी जानेवारी महिन्यात अमेरिकेने केलेल्या ड्रोन हल्ल्यातून जवाहिरी थोडक्यात बचावला होता असे न्यूजवीकने सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे.