अमोदे, बामणोद फळ विक्री सोसायटी निवडणूक जाहीर

0

यावल । शहरासह तालुक्यातील आमोदे व बामणोद येथील सहकारी फळ विक्री सोसायट्यांचा पंचवार्षीक निवडणुकीचा कार्यक्रम जाहिर झाला आहे. यात प्रामुख्यांने येथील कृषी पंडीत व्यंकटराव भगाजी पाटील सहकारी फळ विक्री सोसायटीचा समावेश असल्याने राजकीय वातावरण तापणार आहे. तालुक्याच्या सहकार क्षेत्रातील राजकिय वर्चस्व गाजवणारी ही सोसायटी असुन तिच्या निवडणुकीमुळे राजकीय घडमोडींना वेग आला आहे. यासह आमोदे को-ऑप फ्रुटसेल सोसायटी या सस्थांची प्रारूप मतदार यादी आज प्रसिध्द होत आहे. यावर हरकती घेण्याकरीता 22 जुलै पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. दिपक को-ऑप फ्रुडसेल सोसायटीची यादी जाहीर करण्यात आली आहे.

निवडणूक कार्यक्रम व आरक्षीत जागा
मतदार यादीची पडताळणी करुन इच्छुक उमेदवार मोर्चे बांधणी करतांना दिसत आहे. बामणोद व आमोदे सोसायटीचे निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन एम.पी. भारंबे तर यावल सोसायटीचे निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन राजेश राऊत काम पाहत आहे. सर्वसधारण – 8, अनुसुचित जाती/जमाती – 1, विमुक्त भटक्या जमाती/नामाप्र – 1, इतर मागास – 1 व महिला – 2 असे एकुण 13 संचालक, आमोदे को-ऑप फ्रुडसेल मतदार 343, यावल सोसायटी मतदार – 44, नामनिर्दशन पत्र दाखल 26 ते 30 जुलै, छाणणी 31 जुलै, माघार 2 ते 16 ऑगस्ट मघारीनंतर चिन्ह वाटप तर मतदान 23 ऑगस्ट 8 ते 4वेळेत होणार आहे. बामणोद कार्यक्रम एकुण मतदार – 122, प्रारूप मतदार यादी 15 जुलै. हरकती 20 जुलै, अंतिम मतदार यादी प्रसिध्द 23 जुलै, नामनिर्दशन पत्र दाखल 24 ते 28 जुलै, छाणणी 29 जुलै, माघार 31 जुलै ते 14 ऑगस्ट मघार नंतर लागलीच चिन्ह वाटप तर मतदान 20 ऑगस्ट 8 ते 4 वेळेत.-पुर्ण-फोटो आहे