तळेगाव दाभाडे : माळवाडी येथील पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते अँड अमोल दाभाडे यांची मावळ तालुका युवक काँग्रेसच्या मुख्य संघटकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे युवकचे तालुकाध्यक्ष विलास मालपोटे यांनी दाभाडे यांना नियुक्तीचे पत्र दिले आहे.
यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माऊली दाभाडे,चंद्रकांत सातक,तालुकाध्यक्ष बाळासाहेब ढोरे, वडगावचे नगराध्यक्ष मयुर ढोरे, यादवेंद्र खळदे,कार्याध्यक्ष अॅड. खंडुजी तिकोणे, विजयराव काशीद पाटील, लीगल सेलचे तालुकाध्यक्ष अँड सुधीर भोंगाडे, संभाजी लेंडघर,सचिन काशीद, संपत दाभाडे आदी उपस्थित होते. अमोल दाभाडे हे उत्कृष्ट संघटक म्हणून ओळखले जातात.