अमोल यादवांच्या विमानाला मोदी-फडणवीसांचे नाव

0

मुंबई : अमोल यादव यांनी घराच्या गच्चीवर बनवलेल्या सहा आसनी विमानाचे नामकरण झाले आहे. त्यांनी स्वनिर्मित विमानाला व्हीटी-एनएमडी असे नाव दिले आहे. एनएमडी म्हणजे नरेंद्र मोदी देवेंद्र. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष प्रयत्नामुळे विमानाचे स्वप्न पूर्ण झाल्याने कृतज्ञता म्हणून त्यांचे नाव दिल्याचे यादव म्हणाले.

नोंदणीच्या कामात दिरंगाई
यासंदर्भात अमोल यादव म्हणाले, भारतातील विमानांची व्हीटी या आद्यक्षरांनी नोंदणी होते. त्यानंतरची तीन अक्षरे आवडीनुसार ठेवण्याची मुभा आहे. 2011 मी नोंदणीसाठी अर्ज केला होता. परंतु नोंदणीच्या कामात दिरंगाई झाली. हे विमान 2016मध्ये मेक इन इंडियामध्ये सादर केले. मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांनी यांनी या प्रकल्पास पाठिंबा, सहकार्य देऊ केले. त्यामुळे विमानाच्या नावातील एनएमडी हे नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचे कॉम्बिनेशन आहे, असे यादव म्हणाले.

लवकरच आकाशात झेपावणार
कॅप्टन अमोल यांनी मुंबईतील चारकोप येथील इमारतीच्या गच्चीवर विमानाची निर्मिती केली आहे. भारतात बनवलेले हे पहिले कमर्शियल एअरक्राफ्ट असून, पुढील काही दिवसात ते आकाशात झेपावणार आहे. यादव यांच्या सहाआसनी विमानाची परवानगी तांत्रिक कारणामुळे रखडली होती. अखेर 17 नोव्हेंबरला डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हील एव्हिएशन विभागाने रजिस्ट्रेशन करुन घेतले.