गुन्हा दाखल होता एमआयडीसी पोलिसांनी घेतले ताब्यात
भरदिवसा कापडी पिशवीतून काढले होते पैसे
जळगाव- दुचाकी खरेदीसाठीचे 40 हजार रुपये कापडी पिशवीतून घेवून बाहेर विलास भोसले बाहेर पडले. मात्र पत्नीसोबत मुलगा भांडत करत असल्याने त्याची समजुत करण्यासाठी पुन्हा घरी जावे लागल्याने शेजारच्याच्या घरी पैशांची पिशवी ठेवली. यादरम्यान असता शेजारच्या दाम्पत्याने त्यातील 30 हजार रुपये चोरल्याचा प्रकार रविवारी समोर आला. गुन्हा दाखल होताच एमआयडीसी पोलिसांनी किशोर प्रकाशचंद शर्मा व प्राची किशोर शर्मा रा. अयोध्यानगर या दाम्पत्याला ताब्यात घेतले आहे.
शहरातील अयोध्यानगर येथे विजया विलास भोसले हे पती, मुलाबाळासह स्वतःच्या घरात वास्तव्यास आहे. ते घरकाम करुन उदनिर्वाह भागवितात. त्यांच्या शेजारी भाड्याच्या खोलीत किशोर प्रकाशचंद शर्मा व त्यांच्या पत्नी व मुलगी या कुटुंबासह वास्तव्यास आहे.
काय घडला होता प्रकार
विलास भोसले यांना त्यांच्या मित्रामार्फत महाशिवरात्रीच्या दिवशी नवीन दुचाकी खरेदी करावयाची होती. त्यासाठी 3 मार्च रात्री 9 वाजता भोसले हे कापडी पिशवीतून 40 हजार रुपये घेवून बाहेर पडले अंगणातच असताना देवदर्शनाला सोबत येण्यासाठी भोसले यांचा मुलगा हर्षद वाद घालत होता. त्याचा आवाज आल्याने विलास भोसले हे पैसे असलेली पिशवी शेजारी असलेल्या किशोर शर्मा यांच्या पलंगावर ठेवून पुन्हा घरात गेले. मुलाची समजूत काढली उशीर झाल्याने पुन्हा भोसले शर्मा यांच्या घरुन पिशवी घेवून घरात आले. दुसर्या दिवशी भोसले यांना पिशवीत 40 हजारापैकी 30 हजार गायब असल्याचे दिसले. त्यांनी याबाबत शेजारी शर्मा दाम्पत्याला विचारपूस केली मात्र त्यांनी माहित नसल्याचे सांगितले होते.
घरमालकाला पैसे दिले अन् फुटले बिंग
चोरीच्या पैशांमधून 10 ते 12 दिवसानंतर प्राची शर्मा यांनी त्यांच्या घरमालकाला भाड्याचे 5 हजार रुपये दिले. यातील नोटा या भोसले यांच्या गहाळ झालेल्या 40 हजारातील असल्याचे विजया भोसले यांनी ओळखले. त्यानुसार भोसलेंनी प्राची शर्मा यांना विचारणा केल्यावर त्यांनी उडवाउडवीचे उत्तरे दिली. यानंतर विजया भोसले यांनी प्राची यांचे पती किशोर शर्मा यांना विचारपूस केल्यावर पैशांचे बिंग फुटले. शर्मा यांनी पत्नी प्राची हिनेच पैसे चोरुन मला दिल्याचे भोसलेंना सांगितले. शर्मा पैसे देत नसल्याने विजया भोसले यांनी सोमवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरुन गुन्हा दाखल होताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार संभाजी पाटील, अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, राजेंद्र कांडेलकर यांनी शर्मा दाम्पत्याला ताब्यात घेतले.