अयोध्याप्रकरणी सरन्यायाधीशांचे मोठे विधान !

0

नवी दिल्लीः अयोध्या प्रकरणावरची सुनावणी 18 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होण्याची आवश्यकता आहे. जर सुनावणी 18 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण झाली नाही, तर या प्रकरणावर निर्णय देण्याची संधी जवळपास संपुष्टात येण्याची चिन्हे असे विधान सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी आज गुरुवारी केले. सर्वोच्च न्यायालयातअयोध्या प्रकरणावर सुनावणी झाली असून, सुनावणीचा हा 32वा दिवस आहे.

आज गुरुवारी जेव्हा अयोध्या प्रकरणावरच्या सुनावणीला सुरुवात झाली, त्यावेळी लागलीच सरन्यायाधीशांनी आपले मत व्यक्त केले. जर आम्ही चार आठवड्यात या प्रकरणावर निर्णय दिल्यास एक प्रकारचा चमत्कारच घडेल, असेही सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई म्हणाले आहेत. जर अयोध्या प्रकरणावर 18 ऑक्टोबरपर्यंत सुनावणी पूर्ण न झाल्यास निर्णय येण्याची संधीही जवळपास संपल्यात जमा असल्याचेही ते म्हणाले आहेत.

संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या आणि देशाच्या राजकारणातील सर्वात मोठा असा हा निर्णय असणार आहे. अयोध्येतील रामजन्मभूमी-बाबरी मशिदीच्या वादाचा निर्णायकी फैसला येत्या काही आठवड्यांमध्ये येण्याचे सूतोवाच सरन्यायाधीशांनी केले आहेत.