मुंबई-शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे सहपरिवार आणि कार्यकर्त्यांसह अयोध्या येथे गेले होते. राम मंदिर उभारावे अशी मागणी घेऊन ते अयोध्येला गेले होते. दोन दिवस ते अयोध्येत होते. ‘पहिले मंदिर फिर सरकार’चा नारा देत लाखो शिवसैनिक अयोध्येत गेले होते. दरम्यान उद्धव ठाकरे मुंबईला परतले आहे. यावेळी शिवसैनिकांकडून त्यांचा जंगी स्वागत करण्यात आला. उद्धव ठाकरे यांचा दौरा यशस्वी झाले असल्याचे सांगितले जात आहे.
ढोल-ताश्यांच्या गजरात शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांचे स्वागत करण्यात आले. मुंबई विमानतळावर शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली होती. शिवसेना जिंदाबाद, उद्धव ठाकरे जिंदाबाद अशी घोषणाबाजी करण्यात येत आहे.