नवी दिल्ली: सुप्रीम कोर्टाने अनेक वर्षापासून प्रलंबित आणि विवादित असलेल्या राम मंदिर प्रकरणाचा निपटारा केला. विवादित जमीन रामलल्लाला दिली तर पर्यायी पाच एकर जागा मशिदीसाठी दिली. दोन्ही पक्षकाराला खुश करणारा हा निकाल होता. मात्र हा निकालामुळे काही मुस्लीम संघटनेचे समाधान झालेले नाही. जमैत उलेमा-ए-हिंद या संघटनेने सुप्रीम कोर्टात अयोध्या प्रकरणी फेरविचार याचिका दाखल केली आहे. आज सोमवारी सुप्रीम कोर्टात फेरविचार याचिका दाखल करण्यात आली आहे.
सुप्रीम कोर्टाने आपल्या निर्णयावर फेरविचार करावा अशी मागणी करण्यात आली आहे. यावर कोर्ट काय निर्णय देणार? याकडे लक्ष लागले आहे. अयोध्या प्रकरणी निकाल लागल्यानंतर मुस्लीम समुदायातील काही वर्गाने या निकालाने समाधान नसल्याचे सांगत कोर्टाने फेरविचार करावा अशी मागणी केली होती.