नवी दिल्ली: गेल्या काही दशकांपासून प्रलंबित असलेल्या राम मंदिर आणि बाबरी मशीद प्रकरणी सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय दिला होता. अयोध्येत राम मंदिराची उभारणी करून वक्फ बोर्डाला ५ एकर जागा देण्याचा निर्णय दिला आहे. दरम्यान आज बुधवारी लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिराबाबत मोठी घोषणा केली. राम मंदिर निर्मितीसाठी ट्रस्ट स्थापन करण्यात आल्याची घोषणा केली आहे. या ट्रस्टला रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र असे नाव देण्यात आले आहे असेही मोदींनी लोकसभेत सांगितले.
६७ एकर जमीन राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र समितीला हस्तांतरित करण्यात येणार आहे. राम मंदिर उभारणीसाठी योजना तयार असल्याची माहिती पंतप्रधानांनी लोकसभेत दिली. या पवित्र कार्यात सर्व पक्षीयांनी एकत्र येऊन सहयोग करण्याचे आवाहनही मोदींनी लोकसभेत केले.