इस्लामाबाद । भारताने जास्त आक्रमकता दाखवू नये अन्यथा भारताच्या पुढच्या पिढया लक्षात ठेवतील असे उत्तर देऊ असा धमकीवजा इशारा पाकिस्तानच्या हवाई दलाचे प्रमुख सोहेल अमन यांनी दिला आहे. सोहेल अमन यांनी स्कार्डू येथील कादरी हवाई तळाला भेट दिली. तिथे पाकिस्तानच्या लढाऊ विमानांचा युद्ध सराव सुरु आहे.
पाकिस्तानने भारताच्या सीमारेषेला लागून असलेले सर्व हवाई तळ कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला आहे. सोहेल अमन यांनी स्वत: सुद्धा मिराज विमान चालवले. त्यांनी भारताच्या सियाचीन-ग्लेशिअरमधून हे विमान नेल्याने वाद निर्माण झाला आहे. हवाई तळावर पाकिस्तानी माध्यमांशी बोलताना सोहेल म्हणाले की, पाकिस्तानी हवाई दल कुठल्याही परिस्थितीचा सामना करण्यास पूर्णपणे सक्षम आहे.