अरविंद केजरीवालांनी घेतली अमित शहांची भेट !

0

नवी दिल्ली: दिल्ली विधानसभा निवडणुकीवरून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि भाजपात मोठ्या प्रमाणात आरोप प्रत्यारोप झाले. व्यक्तिगत स्वरूपाचे तीव्र मतभेद या निवडणुकीत दिसून आले. मात्र आता दिल्ली विधानसभा निवडणूक संपली असून तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदावर अरविंद केजरीवाल विराजमान झाले आहे. दरम्यान आज बुधवारी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत. दिल्ली विधानसभा निवडणुकीनंतर दोघांची ही पहिलीच भेट ठरणार आहे. नॉर्थ ब्लॉकमध्ये होणारी ही एक औपचारिक भेट असल्याचे सांगण्यात येत आहे.

विधानसभा निवडणुकीत उभय नेत्यांनी एकमेकांविरुद्ध जोरदार प्रचार केला होती. अनेक टीका करण्यात आल्या होत्या. अशा परिस्थितीत अमित शाह आणि अरविंद केजरीवाल यांची भेट लक्षवेधी ठरणार आहे. केजरीवाल यांनी मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधी सोहळ्यातच केंद्र सरकारला सोबतीला घेऊऩ काम करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आशीर्वादाची गरजही केजरीवाल यांनी व्यक्त केली होती.