अरविंद केजरीवाल नाही, हा तर अरविंद ‘हवाला’

0

नवी दिल्ली । आम आदमी पक्षातून निलंबित करण्यात आलेल्या कपिल मिश्रा यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर पुन्हा निशाणा साधला आहे. आम आदमी पक्षाला मिळणारा निधी हवाला व्यवसायाशी संबंधित कंपन्यांकडून येत असल्याचा आरोप मिश्रा यांनी केला आहे. कपिल मिश्रा यांनी अरविंद केजरीवाल यांच्या नावाचा उल्लेख अरविंद ‘हवाला’ केजरीवाल असा केला आहे. ट्विटरच्या माध्यमातून कपिल मिश्रा यांनी केजरीवालांवर शरसंधान साधले आहे.

आम आदमी पक्षाला हवाला व्यवसायाशी संबंधित कंपन्यांकडून निधी मिळत असल्याचा आरोप कपिल मिश्रा यांनी केला आहे. ‘अरविंद केजरीवाल यांचे नाव अरविंद ‘हवाला’ केजरीवाल असे का ठेवले जाऊ नये ?’ असा सवाल कपिल मिश्रा यांनी उपस्थित केला आहे. दिल्लीचे माजी जलमंत्री असलेल्या मिश्रा यांनी रशिया दौर्‍याबद्दलची माहिती असल्याचा दावा केला.