अरविंद भामरेंच्या कवितासंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

0

बोराडी । किसान विद्या प्रसारक संस्था संचलित डॉ. बी. आर. आंबेडकर अध्यापक विद्यालय येथे शिक्षक म्हणून कार्यरत असलेले अरविंदा भामरे याच्या आसवांचा विद्रोह या कविता संग्रहाला सूर्योदय मंडळ जळगाव यांच्या वतीने विशेष सूर्योदय राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला. कवी अरविंदा भामरे यांचा आसवांचा विद्रोह हा कविता संग्रह गेल्यावर्षी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्यावतीने प्रकाशनार्थ अनुदानातून प्रकाशीत झाला होता. त्यांच्या या कविता संग्रहाची अनेक मान्यवर, वाचक, साहित्यिक, समीक्षकानी दखल घेतली आहे.

खानदेशातून कौतुक
सूर्योदय मंडळ जळगावच्या वतीने दरवर्षी उत्कृष्ठ साहित्य वाड्मयला पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते.या वर्षीचे उत्कृष्ट काव्य पुरस्कार रावसाहेब कुवर (साक्री),यांच्या हरवलेल्या आवाजाची फिर्याद,व विलास गावडे (पनवेल) यांच्या उजेडाची साऊली या काव्यसंग्रहाला तर विशेष राज्यस्तरीय पुरस्कार अरविंदा भामरे *शिरपूर)यांच्या आसवांच्या विद्रोहाला जाहीर झाला आहे. सूर्योदय मंडळाचे अध्यक्ष सतिश जैन यांनी हे पुरस्कार जाहीर केलेत. अरविंदा भामरे यांच्या यशाचे खांदेशातून विशेष कौतूक होत असून किसान विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष तुषार रंधे,सचिव निशांत रंधे, खजिनदार आशाताई रंधे, बोराडी गावाचे उपसरपंच ,युवानेते राहूल रंधे,शिरपूरचे नगरसेवक रोहीत रंधे, डी. एड. कॉलेजचे प्राचार्य बी. डी. पाटील साहीत्यीका सारीका रंधे कर्मवीर व्य. ता. रणधीर ,पतपेडीचे चेयरमन शशांक रंधे, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. फू. ला. बागूल खांदेश साहीत्य संघाचे अध्यक्ष प्रा. सदाशिव सुर्यवंशी, नगरसेवक रोहीत रंधे, प्रा. सु. ल. वैद्य, सर्व साहीत्यीक, मित्र परिवाराने अभिनंदन केले.