अरुंद पुलाचा कठडा तोडत ट्राला कोसळला खाली

0

वरणगाव। महामार्गावर भरधाव वेगावरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने अरूंद पुलाचा कठडा तोडत ट्राला खाली पडला. या अपघातात एक दुचारी चक्काचुर झाली असुन सुदैवाने कोणत्याही प्रकारची हानी झाली नाही. याबाबत वेळोवेळी तक्रारी करून देखील महामार्ग प्राधिकरणाने दखल न घेतल्याने सदरचा प्रकार घडला असल्याची चर्चा यावेळी सुरू होती. कंन्टेनरचालका विरुद्ध बरणगाव पोलिसात अशीरापर्यत नोंद करण्याच काम सुरू होते.

भुसावळकडे जात होते वाहन
वरणगावकडून भुसावळकडे जाणारा ट्राला वाहन क्रमांक एम.एच. 40 ऐ.के. 9819 वरील चालक जावेद खान उद्दीन खान (वय 25, रा.प्रतापगड)वाहन घेऊन जात होता. यावेळी ट्रालाच्या पुढे मोटरसायकल क्रमांक एम.एच. 19 सी.डी. 6777 वरील चालक आकाश टिंटोरे (रा. रामपेठ, वरणगाव) आल्याने टिंटोरे जखमी झाले.

चालकासह क्लीनरने काढला पळ
यावेळी चालकाचे ट्रालावरील नियंत्रम सुटले आणि दुचाकी स्वााराला धडक बसली. यावेळी दुचाकीवरील चालक फेकला गेला व ट्रेलर पुलाचा छोटा कठडा तोडत तीस ते चाळीस फुट नाल्यात जावून पडला. या ट्रालाच्या खाली सदरची दुचाकी देखील दाबली गेली. मात्र दुचाकी स्वार बचावला. अपघात झाल्यानंतर ट्राला चालक व क्लीनर ने येथुन पळ काढला. ट्राला चालकाविरुद्ध वरणगाव पोलिसात उशीरापर्यंत गुन्हा नोंद करण्याचे काम सुरु होते. तपास वरणगाव पोलिस करीत आहे.