चोपडा। विधानसभेचे माजी सभापती अरुणभाई गुजराथी यांचा अमृतमहोत्सवी सत्कार आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली वाटचाल सुरु असलेल्या चोपडा पीपल्स कोे.ऑप बँकेच्या अमृतमहोत्सवी स्थापनादिनाचा सोहळा उद्या चोपड्यात साजरा होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार या सोहळ्याचे अध्यक्षपद भूषविणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व विधानसभेचे सभापती हरिभाऊ बागडे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
सर्वपक्षीय नेते एकाच व्यासपीठावर
या सोहळ्यानिमित्त जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, माजी केंद्रिय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे, केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, राज्याचे आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंत, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, पर्यटनमंत्री जयकुमार रावल, माजी मंत्री दिलीप वळसे-पाटील, माजी महसुलमंत्री एकनाथराव खडसे, माजी मंत्री सुरेशदादा जैन, शेकाप नेते जयंत पाटील, माजी मंत्री अमरिशभाई पटेल आदी मान्यवर नेत्यांसह जिल्ह्यातील सर्वच राजकीय पक्षाचे पदाधिकारी एकाच व्यासपीठावर उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे प्रामुख्याने अरुणभाई गुजराथींसह ज्येष्ठ नेते शरद पवार, मुख्यमंत्री फडणवीस, सुशिलकुमार शिंदे व एकनाथराव खडसे यांच्या भाषणांमधील राजकीय जुगलबंदीची उत्सुकता वाढलेली आहे.