जळगाव । दोन दिवसानंतर मुस्लीम समुदायांचा पवित्र रमजान सण साजरा केला जाणार आहे. सध्या पवित्र रमजान महिना सूरू आहे. शनिवारी 24 रोजी अरुणोदय ज्ञान प्रसारक मंडळ अंतर्गत असलेल्या बचपन प्ले स्कूल व अकॅडमिक हाईटस पब्लिक स्कूल जळगाव येथे रमजान ईद साजरी करण्यात आली.
यावेळी विद्यार्थ्यांना रमजान महिन्याचे महत्व सांगण्यात आले. सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचार्यांची यावेळी उपस्थिती होती.