शाहजहांपूर । आई आणि मुलाचं नाते हळवे नाते असते. इतर सर्व नात्यापेक्षा हे नाते सर्वश्रेष्ठ मानले जाते. मात्र, म्हणतात ना की प्रेमात कोण काय करेल काही सांगता येत नाही. एक आई चक्क तिच्या प्रियकरासाठी तिच्या एक दोन नव्हे, तर सहा मुलांना वार्यावर सोडून निघून गेली आहे. इतकेच नाही तर तिने तिच्या नावावर असलेली 18 एकर जमीनही प्रियकराच्या नावावर केली. आता सोबत आईही नाही आणि खाण्याचा दुसरा मार्गही नाही, त्यामुळे या सहा मुलांवर उपाशी मरण्याची वेळ आली आहे. ही घटना आहे उत्तर प्रदेशातील शाहजहांपूर जिल्ह्यातील, मदनापूर पोलीस ठाणे अंर्तगत राजपूतपूर चिती हे गाव आहे.
या गावात राहणार्या राम अवतार या व्यक्तीचे लग्न 20 वर्षांपूर्वी रोशनी देवी या महिलेशी झाले. त्यांच्या संसाराची वेल चांगलीच बहरली. त्यावर एक नव्हे तर तब्बल 6 फुले फुलली. त्यांचा सर्वात मोठा मुलगा सूरज हा 18 वर्षांचा आहे, तर सर्वात लहान मुलगी आहे. तिचं वय 5 आहे. राम अवतार शेतीकरून कुटुंबाचा उदयनिर्वाह करायचा. मात्र, तीन वर्षांपूर्वी आजारामुळे त्याचं निधन झाले. मृत्यूसमयी त्याचे सर्व मुले अल्पवयीन असल्याने त्याने त्याची सर्व 18 एकर जमीन त्याच्या पत्नीच्या नावे केली. राम अवतारच्या मृत्यूनंतर त्याची पत्नी रोशनीदेवीच्या गावाच्या शेजारी राहणार्या अवेश्वर सिंग याच्याशी ओळख झाली. त्यातूनच त्यांच्यात मैत्री वाढत गेली आणि पुढे त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. रोशनी देवी विधवा असल्याने तिलाही एका पुरुषाची गरज होतीच. त्यांचे हे प्रेम दिवसेंदिवस वाढतच गेले. अवेश्वर घरी येत होता आणि घरी नेहमी तिची मुले असायची. त्यामुळे तिला आता तिच्या प्रेमप्रकरणात मुलांचा अडसर वाटू लागला. आणि एक दिवस ती तिच्या प्रियकरासोबत गाव सोडून फरार झाली. महत्त्वाचे म्हणजे रोशनी देवीने लग्न केलेला तरुण हा तिच्या सर्वात मोठ्या मुलापेक्षीही वयाने लहान आहे.
परत येण्यास नकार
आई सोडून गेल्यानं मुलांचे चांगलेच हाल सुरू होते. खाण्यापिण्यासाठी दुसरा मार्ग उरला नसल्याने कुणी हमाली करायचा, तर कुणी कुणाच्या शेतावर कामाला जायचा. इतके मोठे कुटुंब पोसणे काकालाही शक्य नसल्याने त्यांची उपासमार होऊ लागली. मुलांनाही आईची आठवत सतवायची. त्यामुळे एकदा सूरजपाल आईला भेटायला गेला. तेव्हा त्याच्या आईने सोबत येण्यास नकार दिला. त्यानंतर काही दिवसांनी पुन्हा तो झालं गेले सर्व विसरून किमान सर्वात छोटी मुलगी जी 5 वर्षांची आहे तिचा सांभाळ करावाा यासाठी तो पुन्हा आईकडे गेला. मात्र, तेव्हा त्याला त्याची आई दिसली नाही. आईच्या प्रियकराने सांगितले की त्याची आई त्याला सोडून निघून गेली.
पोलिसांत तक्रार
हताश झालेल्या सूरजपालनं अखेर पोलिसांमध्ये तक्रार दिली. तसंच त्यांनी एसपीची भेट घेऊन जमीन परत मिळवून देण्याची मागणीही केली आहे. तर पोलिसांनी यावर कठोर कार्यवाही करण्याचा निर्णय घेतला आहे. आई आणि प्रियकरावर गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कार्यवाही करण्याची तयारी पोलिसांनी केली आहे. मात्र आईच्या या कृत्यामुळे सर्व जबाबदारी आता मोठा मुलगा सूरजपालवर आली आहे. तसंच आईनं शेती प्रियकराच्या नावे केल्यानं त्यांच्यावर भीक मागण्याची वेळ आली आहे.