जळगाव – मागेच सुरेश प्रभुंनी राज्यातील सर्वच रेल्वे स्थानकांचा सर्वे केला. त्यातून विविध रेल्वे स्थानकांना क्रमांक देण्यात आले. तेव्हापासूनच राज्यात सर्वच रेल्वे स्थानकांत स्वच्छतेसाठी धावपळ सुरू झाली आहे. भुसावळसह जळगावच्या रेल्वेस्थानकावरही स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी चक्क ङ्गदीवारफ व ङ्गशोलेफ या चित्रपटांच्या पोस्टर्सचा आधार घेण्यात आलेला आहे. दोन्ही चित्रपटांत गाजलेल्या डायलॉगच्या मदतीने स्वच्छतेला प्रोत्साहन देण्याबरोबरच अस्वच्छता करणार्यांना कायद्याची आठवणही या पोस्टर्सद्वारे करून दिली जात आहे.
मध्य रेल्वेने जळगाव रेल्वेस्थानकावर फलाट तीन व चारवर मोठ्या दादर्यावरून उतरताना प्रवासी शेडच्या खांब्यावर शोलेफ चित्रपटाचे पोस्टर्स लावले आहेत. त्यावर ङ्गअरे ओ सांभा, कितना जुर्माना रखे है सरकारने रेल परिसर में गंदगी फैलाने पर? 500 रुपये… पूरे 500 रुपयेफ असा डायलॉग आहे. तो वाचल्यावर प्रवासी आपसूकच हातातील रॅपर, कचरा फलाटावर न फेकता कचराकुंडीत टाकण्यासाठी पुढे सरसावत असल्याचा प्रत्यय येतो. भुसावळ रेल्वेस्थानकावरही केला सायडिंगकडून असलेला दादरा चढल्यावर दर्शनी भागात ङ्गबिग बीफ अमिताभ बच्चन व शशी कपूरच्या ङ्गदीवारफ चित्रपटाचे पोस्टर्स लावले आहेत. त्यावर ङ्गमेरे पास रेलगाडी है, रिझर्व सीट है; तुम्हारे पास क्या है?.. मेरे मुँह में पान है, खबरदार! दीवार पर मत थूकना, नहीं तो 500 रुपये जुर्माना लगेगाफ हा संवाद लिहिलेला आहे.
पोस्टरची शक्कल लय भारी
भारतीय गुणवत्ता परिषदेने 407 रेल्वेस्थानकांचे सर्वेक्षण केले होते. त्यात ङ्गएफ श्रेणीत भुसावळ स्थानक 24, तर जळगाव 115व्या क्रमांकावर आहे. भविष्यात गुणांकनात ही स्थानके अव्वल ठरावीत म्हणून मध्य रेल्वेने जनमानसात अढळ स्थान मिळवलेल्या चित्रपटांच्या पोस्टर्सचा वापर केला आहे. ङ्गयहाँ थूकना मना हैफ, ङ्गभिंतीवर थुंकू नयेफ, ङ्गयेथे कचरा टाकू नयेफ अशा सूचना लिहूनही त्याचा उपयोग होत नाही म्हणून रेल्वेने ही पोस्टर्सची शक्कल लढवली आहे.
कायद्याचा धाक
ङ्गशोलेफ चित्रपट सन 1975मध्ये प्रदर्शित झाला. त्यात गब्बरची भूमिका साकारलेले अमजद खान यांचा ङ्गअरे ओ सांभा, कितना इनाम रखे है सरकार हम पर?फ हा डायलॉग प्रचंड गाजला. आजही रसिकांना तो तोंडपाठ आहे. चित्रपटांचे हेच गारूड लक्षात घेऊन मध्य रेल्वेकडून स्थानकांवर याच डायलॉगच्या मदतीने स्थानकावर घाण केली तर किती दंड होऊ शकतो, हे प्रवाशांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न होत आहे.