रावेर : रावेर तालुक्यात शनिवारी तब्बल आठ कोरोना पॉझीटीव्ह रुग्ण आढळल्याने तालुक्यात मोठी खळबळ उडाी आहे. दिवसागणिक तालुक्यात ालुक्यात कोरोना पॉझीटीव्ह रुग्ण वाढत असल्याने प्रशासन व नागरीकांची चिंता वाढली आहे. रावेर तालुक्यात सतत दुसर्या दिवशी तब्बल आठ कोरोना पॉझीटीव्ह रुग्ण आढळून असून त्यातील रावेर शहरातील तीन, खानापूरातील एक तर सावद्यात चार रुग्णांचा समावेश आहे. तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी पॉझीटीव्ह रुग्णांचा रहिवासी भाग आता कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे तर रावेर व सावद्यात मुख्याधिकारी तर खानापूर येथे बीडीओ रहिवासी भाग सील करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.