शिंदखेडा – महाराष्ट्र राष्ट्रीय आष्टेडू आखाडा असोसिएशन संलग्नता – भारतीय राष्ट्रीय आष्टेडू आखाडा महासंघ स्कुल गेम फेडरेशन ऑफ इंडिया व अहमदनगर जिल्हा आष्टेडू आखाडा असोसीएशन यांच्या विद्यमाने सन 2018 साठी घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत शिंदखेडा येथील अर्जित महाजनलावर्ण पदकाने सन्मानित करण्यात आले. अभियंता उमेश महाजन यांचा तो मुलगा आहे.
गिगल्स-डे-केअर, बोरडेवाडी-मोशी, पुणे येथील कु.शिरीषा मालखेडकर – सुवर्ण पदक, तेजस जंजाल – ब्राँझ पदक मिळवले असून ही स्पर्धा राज्यभरातून आलेल्या निरनिराळ्या सिनिअर, ज्युनिअर, सबज्यूनीअर विभागातून मुले व मुलींसाठी घेण्यात आली. या चिमुकल्यांना कोच पल्लवी खरात यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले. तसेच गिगल्स डे केअर चे चेअरमन विजय महाजन, संचालिका कीर्ती महाजन, राहुल माळी, ईश्वर माळी, हितेश माळी यांनी यशस्वी विद्यार्थ्या चे अभिनंदन केले असून समाजातील सर्वच स्तरातून बालगोपालांचे कौतुक होत आहे.