अर्जुनची मुंबईच्या 19 वर्षे मुलांच्या संघात निवड

0

मुंबई । मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरची मुंबईच्या 19 वर्षांखालील संघात निवड झाली आहे. अर्जुन वडोदरा येथे होणार्‍या 19 वर्षाखालील गटाच्या जे. वाय. लेले अखिल भारतीय एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत भाग घेणार आहे. यापूर्वी अर्जुन तेंडुलकर मुंबईच्या 14 वर्षांखालील आणि 16 वर्षांखालील संघामधून खेळला आहे. मात्र, आता त्याची निवड 19 वषार्ंखालील संघासाठी करण्यात आली आहे.

जे.वाय लेले एकदिवसीय स्पर्धा 16 सप्टेंबरपासून वडोदरा येथे सुरु होणार आहे आणि 23 सप्टेंबरपर्यंत रंगणार आहे. अर्जुन तेंडुलकर गेल्या काही दिवसांपासून लंडनमध्ये वेगवान गोलंदाजीचे प्रशिक्षण घेत होता. त्याने 14 वषार्ंखालील आणि 16 वर्षांखालील संघातून खेळताना आपली जबरदस्त कामगिरी यापूर्वीच दाखवली आहे. मुंबईचा संघ -अग्नी चोपडा, दिव्यांश सक्सेना, भूपेन लालवानी, अंजदीप लाड, सागर छाब्रिया, शोएब खान, सत्यलक्श जैन, वेदांत मुरकर, ध्रुव बिद, तानुष कोटीयन, नकुल मेहता, फरहान काझी, अथर्व अंकोलेकर, अभिमन्यु वशिष्ठ, अर्जुन तेंडुलकर, सक्षम पराशर, सक्षम झा, सिल्वेस्टर डिसोझा.