मुंबई : बॉलीवूडची हौटेस्ट मॉम मलायका अरोरा खान आणि अरबाज खान गेल्यावर्षीच एकमेकांपासून विभक्त झाले. या दोघांच्या घटस्फोटाचे कारण खरे तर अर्जुन कपूर असल्याचे म्हटले जाते.
मलायकाचा २३ ऑक्टोबरला वाढदिवस होता. हा वाढदिवस मलायकाने अर्जुनसोबत युरोपला जाऊन साजरा केला. सेलिब्रेशन करुन परतताना अर्जुन आणि मलायकाला मुंबई विमानतळावर पाहिले गेले होते. मुंबईला परतल्यावर इंडियाज गॉट टॅलेंटच्या सेटवर पोहोचलेल्या मलायकाला करण जोहरने अर्जुनवरुन चिडवण्यास सुरुवात केली. हा व्हिडिओ करणने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केला आहे.
मलायका तू आत्ताच युरोपवरुन परतलीस, तू तिथे काय केले? तुझी ट्रीप कशी झाली? तिकडे तू एकटी गेली होतीस का? असे प्रश्न विचारत करणने तिची फिरकी घेतली. मात्र, इस सवाल को सवाल ही रहने दो, असे म्हणत मलायकाने याबद्दल काहीही बोलणं टाळलं.