अर्जुनसोबत चित्रपटात अभिनेत्रीच नाही

0

मुंबई – कुठलाही चित्रपट असो अभिनेता आणि अभिनेत्री हे दोन पात्र महत्वाचे असतातच. मात्र अर्जुनने या वेळीस चित्रपटाचा पूर्ण भर स्वतःचाच्या खांद्यावर घेतलं आहे. अर्जुनने राजकुमार गुप्ता यांच्या ‘इंडियाज मोस्ट वॉन्टेड’ या चित्रपटाचे शूटींग सुरु केले आहे. पण, या चित्रपटाची एक खास गोष्ट म्हणजे यात हिरोईनच नाही.

चित्रपटाची स्टोरी फार इंटरेस्टिंग आहे आणि हा चित्रपट करताना खूपच उत्सुक असल्याचे अर्जुनने सांगितले. ‘इंडियाज मोस्ट वॉन्टेड’ हा एक वेगळा चित्रपट असणार आहे. अर्जुन या चित्रपटात गुप्तहेराच्या भूमिकेत दिसेल. राजकुमार गुप्ता यांना उगाचच अभिनेत्रीची व्यक्तीरेखा कोंबण्याची इच्छा नव्हती. त्यामुळे त्यांनी अभिनेत्रीचे पात्र न दाखविण्याचा निर्णय घेतला.