मुंबई : अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा पूर्ण बॉलीवूडमध्ये आहे. दोघांनीही आपलं नातं सगळ्यांपासून लपवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून ‘प्यार किया तो डरना क्या’ म्हणत या दोघांनीही आपलं आयुष्य मनाप्रमाणे जगायला सुरूवात केली आहे. करणच्या चॅट शोमध्ये अर्जुनने बहीण जान्हवीसोबत हजेरी लावली. अर्जुनने पहिल्यांदाच या शोमध्ये लग्नासाठी तयार असल्याची कबुली दिली.
करणने अर्जुनला त्याचं ‘रिलेशनशीप स्टेटस’ विचारलं तेव्हा, मी सिंगल नाही असं उत्तर अर्जुनने दिलं. अर्जुनच्या या उत्तराने जान्हवीसुद्धा आश्चर्यचकीत झाली.
आता अर्जुन सिंगल नाही असं म्हटल्यावर पुढे त्याच्या लग्नाचा प्रश्न आलाच. त्याविषयी अर्जुन म्हणाला की, ‘हो, मी आता लग्नासाठी तयार आहे. आधी नव्हतो.’ असे म्हणत मलायकासोबत लग्नाला तयार असल्याचा इशारा दिला आहे.