अर्जुन भोई भाजपा भटके आघाडी प्रभारीपदी

0

लोहारा। पाचोरा तालुक्यातील लोहारा येथील अर्जुन भोई यांची महाराष्ट्र राज्य भाजपा भटके विमुक्त आघाडी उत्तर महाराष्ट्र प्रभारीपदी नेमणुक करण्यात आली आहे. अर्जुन भोई हे भोई-भटक्या समाजातील आहे. राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थित मुंबई येथे झालेल्या बैठकीत त्यांची निवड करण्यात आली.

यावेळी आघाडीचे अध्यक्ष योगेश जीबन, प्रकाशजी लोणारे यांच्यासह नागपुर तथा राज्यातील संपुर्ण जिल्ह्याचे आघाडीचे अध्यक्ष गण हजर होते. भोई हे आघाडीचे विद्यमान राज्यउपाध्यक्ष, भोई समाज क्रांतीदल, महाराष्ट्र राज्य सरचिटणीस तथा अखिल भारतीय भोई समाज समन्वय समिती नवी दिल्लीचे प्रभारी सदस्य आहेत. त्यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरातुन स्वागत केले जात आहे.