अर्जुन रामपालवर कंपनीने फसवणूकीची तक्रार केली दाखल

0

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपालने कंपनीचे पैसे परत न केल्यामुळे त्याच्याविरोधात फसवणूकीची तक्रार करण्यात आली आहे. वाय एंटरटेनमेंट लिमिटेड कंपनीने ही तक्रार दाखल केली आहे. अर्जुनने १२ टक्के व्याजावर कंपनीकडून एक कोटी रूपये घेतले होते. ९० दिवसांमध्ये सर्व पैसे परत करण्याच्या अटीवर पैसे दिले होते. मात्र अद्याप अर्जुनने परफेड केली नसल्याचा आरोप वाय इंटरटेनमेंट लिमिटेड कंपनीने केला आहे.

अर्जुन रामपालने ९ मे २०१८ रोजी एक कोटी रूपये व्याजाने घेतले होते. ९० दिवसांच्या आत व्याजासहीत ते सर्व पैसे परत देण्याचा करार कंपनीसोबत झाला होता. मात्र मुदत संपूनही अर्जुनने ते पैसे परत केले नाहीत. त्यानंतर अर्जुनने कंपनीला एक चेक दिला होता तो देखील बाऊन्स झाला. त्यामुळे कंपनीने अर्जुनविरोधात कायदेशीर तक्रार दाखल केली आहे.