अर्जुन रामपाल विरोधात आर्थिक फसवणुकीची तक्रार

0

मुंबई : वाय एंटरटेनमेंट लिमिटेड कंपनीने अर्जुन रामपाल विरोधात आर्थिक फसवणुकीची तक्रार केली आहे. अर्जुनने या कंपनीकडून व्याजावर पैसे घेतले होते, मात्र अद्यापही ते परत केले नसल्याचा आरोप केला आहे.

अर्जुनने ९० दिवसांत पैसै परत करण्याच्या अटीवर कंपनीकडून १ कोटी रुपये घेतले होते. १२ टक्के व्याजाने हे पैसे घेतले गेले होते. मात्र, ९० दिवस उलटून अद्यापही त्याने हे पैसे परत केले नसल्याने आर्थिक फसवणूकीचा दावा कंपनीने केला आहे.