अर्णबला अटक लोकशाहीला लाजवणारी घटना: अमित शहा आक्रमक

0

नवी दिल्ली: रिपब्लिक भारत या वाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना आज बुधवारी ४ रोजी सकाळी रायगड पोलिसांनी अटक केली आहे. २०१८ मध्ये इंटिरियर डिझानयर अन्वेय नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणात अर्णब गोस्वामींवर कारवाई करण्यात आली आहे. अर्णबच्या अटकेवरून भाजप आक्रमक झाले असून तीव्र प्रतिक्रिया समोर येत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ट्वीट करत राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘अर्णबला अटक पुन्हा एकदा आणीबाणीची आठवण करून देते, लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या माध्यमांवर हा व्यक्तिगत हल्ला असून तो रोखला पाहिजे, ते आम्ही रोखू’ असे ट्वीट अमित शहा यांनी केले आहे.

कॉंग्रेसची आणीबाणीची मनस्थिती कायम आहे, लोकशाहीला लाजवणारी ही घटना आहे असे आरोप अमित शहा यानी केले आहे.