मुंबई: रिपब्लिक भारत या वाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना आज बुधवारी ४ रोजी सकाळी रायगड पोलिसांनी अटक केली आहे. २०१८ मध्ये इंटिरियर डिझानयर अन्वेय नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणात अर्णब गोस्वामींवर कारवाई करण्यात आली आहे. अर्णबच्या अटकेवरून भाजप आक्रमक झाले असून तीव्र प्रतिक्रिया समोर येत आहे. दरम्यान अन्वेय नाईक यांच्या कुटुंबीयांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट केली. अर्णबच्या त्रासाला कंटाळून अन्वेय नाईकांनी आत्महत्या केली, मात्र अर्णबला शिक्षा झाली नाही. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना देखील पत्र दिले होते, मात्र तरीही काही झाले नसल्याने अखेर कोर्टाने हे प्रकरण पुन्हा उघडले असे अन्वेय नाईक यांच्या पत्नी आणि मुलीने सांगितले.
आम्हाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली, कुटुंबियांना त्रास देण्यात आल्याचे आरोप नाईक यांच्या पत्नीने केला आहे. आमचा राजकारणाशी काहीही संबंध नाही, सरकार आमच्यासोबत आहे असेही नसल्याचे स्पष्टीकरण या पत्रकार परिषदेत देण्यात आले आहे.
अलिबाग कोर्टात अर्णबची सुनावणी सुरु आहे.