अर्थसंकल्पातून आर्थिक शिस्त बिघडल्याचे स्पष्ट

0

मुंबई :- काल नागरिकांनी चंद्रग्रहण पाहिलं आज दुपारीच अर्थसंकल्पामुळे तारे दिसले आहे. बेरोजगारांना रोजगार निर्मितमधील फोलपणा आज समोर आला. गेल्या तीन वर्षांत शेतकऱ्यांना आधारभुत किंमत मिळाली नाही. त्यांना पाने पुसली आहेत. शेती क्षेत्राला वेगळ्या मार्गावर न्यायच आहे. गरिबांना घरे आतापर्यंत का बांधली नाहीत. नुसत्या घोषणा आणि जाहिरातबाजी केली जातेय. आता शासनाकडून 2019 सांगितलं जातं नाही 2022 सांगितलं जातेय.

फिजिकल डीफिशीएट 3.3 टक्क्यांनी वाढला आहे. अर्थसंकल्पातून आर्थिक शिस्त बिघडल्याचे दिसून येत आहे. बजेट सादर झाल्यावर आज सेन्सेक्स खाली आलाय. मध्यमवर्गीय लोकांच्या जीवावर सरकार आलं त्या लोकांनाही काही मिळालेलं नाही. शेतकरी, शेतमजूर, तरुण, महिला आणि कुठल्याही घटकांसाठी ठोस तरतुदी या बजेटमध्ये नाहीत. अनेक योजना घोषित केल्यात मात्र प्रत्यक्षात फलश्रुती काय? आगामी निवडणुकीत देशातील जनता त्यांना नक्की जागा दाखवेल. महाराष्ट्रात रेल्वेचा प्रकल्प येतोय त्याचे आम्ही स्वागत करतो.

-सुनील तटकरे
प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस