मुंबई: आज राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प मांडला. यात त्यांनी शेतकरी, महिला, आरोग्य क्षेत्रासह विविध क्षेत्रासाठी योजना जाहिर केल्या. दरम्यान शेतकऱ्यांना मोठी भेट अर्थसंकल्पाच्या माध्यमातून देण्यात आली आहे. शेतकऱ्यांना बिनव्याजी पीक कर्ज देण्याची घोषणा करण्यात आली आहे. 3 लाखांपर्यंत पीक कर्ज घेतल्यास 0 टक्के व्याजदर असणार आहे. व्याजाची रक्कम राज्य सरकार भरणार आहे.