अर्थसंकल्पात काहीही नाही, केवळ पोकळ भाषण: विरोधी पक्षनेत्यांची टीका

0

मुंबई: महाविकास आघाडी सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर करण्यात आला. अर्थमंत्री अजित पवारांनी अर्थसंकल्प सादर केला. सत्ताधारी पक्ष अर्थसंकल्पाचे स्वागत करत असून विरोधकांनी विरोध केला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या अर्थसंकल्पात नवीन काहीही नाही, हा अर्थसंकल्प नाही तर केवळ भाषण आहे. अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर केले नाही तर जाहीर सभेत भाषण केल्याचे आरोप केले आहे. अर्थसंकल्पात कोणतीही सकारात्मक आकडेवारी दिसत नाही. उत्तर महाराष्ट्र, विदर्भाच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम सरकारने केले आहे. केवळ निधी पळवून नेण्याचे काम या सरकारने केले आहे.

पिक कर्जाव्यतिरिक्त काहीच योजना नाही. केंद्र सरकारच्या नावाने खापर फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला असून केंद्राच्या योजनेचा श्रेय घेण्याचा प्रयत्न केला गेल्याचे आरोपही देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.