मुंबई: आज फडणवीस सरकारच्या कार्यकाळातील शेवटचा अर्थसंकल्प मांडण्यात येत आहे. विधानसभेत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार तर विधान परिषदेत अर्थ राज्यमंत्री दिपक केसरकर अर्थसंकल्प सादर करत आहे. दरम्यान विधान सभेत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात जलसंपदा विभागासाठी 12 हजार 597 कोटींचा निधी प्रस्तावित करण्यात आल्याची घोषणा केली. सूक्ष्म व लघुसिंचन वाढविण्यासाठी शासन प्रयत्नशील असून सर्व सिंचनप्रकल्प पूर्ण केले जातील असे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. त्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी प्रस्तावित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी जलसंपदामंत्री गिरीश महाजन देखील सभागृहात उपस्थित होते. जलसंपदामंत्री गिरीश महाजन हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अतिशय निकटवर्तीय मानले जातात, त्यामुळेच ना.महाजन यांना मोठा निधी खेचून आणण्यात यश आले आहे.