मुंबई: महाविकास आघाडी सरकारचा पहिला अर्थसंकल्प आज गुरुवारी जाहीर झाला. अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर केला. गेल्या काही वर्षांपासून बांधकाम क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. त्याला चालना देण्यासाठी अजित पवारांनी मोठी घोषणा केली. मुद्रांक शुल्कात एक टक्का कपात करण्यात येणार असल्याचे अजित पवारांनी जाहीर केले. त्यामुळे सरकारवर १८०० कोटींचा बोजा पडणार असला तरी बांधकाम क्षेत्राला चालना मिळणर आहे. एमएमआरडीए, पुणे, नागपूरमध्ये महापालिका क्षेत्रात येणाऱ्या बांधकांमांना ही सवलत लागू असेल. यामुळे राज्याला २५ हजार कोटींचं नुकसान होणार असल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगितलं.