ज्येष्ठ पत्रकार डॉ. उदय निरगुडकर यांचे प्रतिपादन
पिंपरी-चिंचवड : शिक्षण क्षेत्राचे बाजारीकरण झाल्याने शुद्ध ज्ञानाची उणीव आज भासत आहे. ज्ञानदानाची पातळी किंवा गुणवत्ता वारंवार तपासून पाहायला हवी. यासाठी ज्याप्रमाणे दरवर्षी आर्थिक बाबींचा आढावा घेण्यासाठी देशाचा अर्थसंकल्प मांडण्यात येतो. त्याप्रमाणे देशाच्या ज्ञानार्जनाचा आढावा घेण्यासाठी देशाचा ज्ञानसंकल्पही मांडण्यात आला पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार डॉ. उदय निरगुडकर यांनी केले. ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालय स्नातक संघाच्या वतीने देण्यात येणारा ’प्रबोध रत्न पुरस्कार’ सोहळा शनिवारी निगडी येथील ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालयाच्या मनोहर वाढेकर सभागृहात पार पडला. या पुरस्कार वितरण सोहळ्यात डॉ. निरगुडकर बोलत होते.
यांची होती उपस्थिती
या पुरस्कार वितरण सोहळ्यास प्रमुख पाहुणे दीपक घैसास, सुभाष देशपांडे, डॉ. राधिका पटवर्धन, ज्ञानप्रबोधिनीचे वामनराव अभ्यंकर, मनोज देवळेकर, डॉ. योगेश मोरे, डॉ. राधिका पटवर्धन-जाधव, कर्नल अभय पेंडसे, अमोल आढाव, सुजय डहाके, राजेंद्र शिंदे, डॉ. अश्विनी महाजन आदींची उपस्थिती होती.
पुरस्कारार्थींची नावे अशी
या सोहळ्यात व्यावसायिक सेवा क्षेत्राचा पुरस्कार डॉ. योगेश मोरे, सैन्य, प्रशासकीय व शिक्षण क्षेत्राचा पुरस्कार डॉ. राधिका पटवर्धन-जाधव, कर्नल अभय पेंडसे, कला-क्रीडा क्षेत्राचा पुरस्कार अमोल आढाव, सुजय डहाके, उद्योजकता क्षेत्राचा पुरस्कार राजेंद्र शिंदे आणि समाजसेवा क्षेत्राचा प्रबोधरत्न पुरस्कार डॉ. अश्विनी महाजन यांना प्रदान करण्यात आला. पुरस्कारांचे वितरण ज्येष्ठ पत्रकार डॉ. उदय निरगुडकर व जेन्कोव्हॅल समूहाचे अध्यक्ष दीपक घैसास यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यंदा पुरस्काराचे तिसरे वर्ष होते.
संयोजनात यांचा हातभार
कार्यक्रमाचे नियोजन मनोज देवळेकर, आशिष शाळू, प्रशांत आहेर, श्वेता जहागीरदार, डॉ. मृणाल मायदेव-धोंगडे, प्रशांत कोंडे, प्रवीण पाटील, शशांक म्हसवडे, सुहास गुघाटे आदींनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सीमा शेख यांनी केले. तर आभार प्रशांत आहेर यांनी मानले.