नवी दिल्ली- मोदी सरकारच्या शेवटचा अंतरिम अर्थसंकल्प आज प्रभारी अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी मांडले. रेल्वेचे अर्थसंकल्प देखील यावेळी मांडण्यात आले. रेल्वे प्रवाशांसाठी ‘वंदे भारत’ही नवीन एक्स्प्रेस सुरु करण्याची घोषणा अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी केली आहे. तसेच देशभरात आता एकही मानवरहित फाटक उरलेले नाही, असा दावा यावेळी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी केला.