अर्थसंकल्प २०१९: २१ हजार पगार असलेल्यांना मिळणार ७ हजार बोनस !

0

नवी दिल्ली- केंद्रीय अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी नोकरदारांसाठी मोठी घोषणा केली आहे. २१ हजार पगार असलेल्यांना ७ हजार बोनस देण्यात येणार आहे. ईपीएफओच्या माध्यमातून हा ७ हजार बोनस मिळणार असल्याचंही गोयल यांनी जाहीर केले आहे. प्रतिमहिना १५ हजार रुपयांहून अधिक पैसे कमावणाऱ्या मजुरांना श्रमयोगी मानधन योजनेचा लाभ मिळणार आहे. तसेच मजुरांच्या मृत्यूनंतर ६ लाखांची नुकसानभरपाईसुद्धा देण्यात येणार आहे.

मोदी सरकारच्या कार्यकाळातील शेवटचा अंतरिम अर्थसंकल्प अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी आज संसदेत सादर केला. यावेळी मोदी सरकारने शेतकरांना मोठी भेट दिली आहे. प्रधानमंत्री किसान शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत दोन हेक्टरपर्यंत जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दरवर्षी सहा हजार रुपये जमा करण्यात येणार असल्याचे अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी जाहीर केले.