अर्थे येथे प्रगतीशिल शेतकर्‍यांचा सत्कार

0

अर्थे । टेकवाडे येथील आर. सी. पटेल प्राथमिक शाळेत कृषी दिनानिमित्त गावातील प्रगतशील शेतकर्‍यांचा सत्कार करून शालेय परीसरात वृक्षरोपण करण्यात आले. कृषीदिनाचे औचित्य साधून ग्रामपंचायत टेकवाडे व आर. सी. पटेल प्राथमिक शाळा टेकवाडे, के. व्ही. पटेल कृषी महाविद्यालय शहादा यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय विद्यार्थ्यांची वृक्ष दिंडी काढण्यात आली. तसेच शालेय परिसरात वृक्षरोपण करण्यात आले. याप्रसंगी टेकवाडे येथील प्रगतशील शेतकरी पुरूषोत्तम नारायण पटेल, काशिनाथ पटेल, नानाभाई धनगर, सदाशिव वाडीले, विजय जगन्नाथ चौधरी यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सरपंच संजय धनगर, संतोष ढोले, बापू पारधी, आशा भिल, मोतीलाल पटेल, मुख्याध्यापक बी. आर. महाजन आदी उपस्थित होते. प्रास्तविक आर. पी. कुळकणी यांनी केले. यशस्वीतेसाठी के. बी. सोनवणे, जे. एस. करडे, डी. एम. महाजन, एस. जे. सोनार, बी. एल. पावरा, अभिजीत ईशी यांनी कामकाज
पाहिले.